सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात अट्टल गुन्हेगाराला अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरातील भोणे फाटा रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे.

Nandurbar. MH
  • Apr 29 2022 3:22PM

नंदुरबार - शहरातील भोणे फाटा रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीने सोनसाखळी हिसकावणे, घरफोडी, चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 26 एप्रिल रोजी सापळा रचून खोजल्या वण्या तडवी रा.बिजरीगव्हाण या.अक्कलकुवा याला ताब्यात घेतले असता त्याने आपला चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी यांच्या सोबत 8 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीच्या दुचाकी जप्त करुन आरोपींकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी तळोदा येथील मंगलाबाई राजाराम चौधरी या महिलेचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले होते.नंदुरबार शहरातील कल्याणी पार्क येथून 2 ए.सी.चोरुन नेले.तळोदा बसस्थानक परिसरात एक किराणा दुकान फोडून किराणा माल चोरी केला. या आणखी तीन गुन्ह्यांची कबुली दिली.पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.सदर कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर,सपोनि संदिप पाटील,असई अनिल गोसावी, प्रमोद सोनवणे, सुनील पाडवी,विशाल नांगरे, बापू बागुल, रमेश साळुंखे यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार