सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सलग 3 दिवसात कोरोनामुळे 5 मृत्यू नंदुरबारचा वाढतोय मृत्यूदर

नंदुरबार - आज गुरुवार रोजी आणखी 2 पॉझिटिव्ह महिलांचा मृत्यू झाला. कोरोनाने सलग अवघे तीन दिवसात झालेला हा 5 वा मृत्यू असून ऑगस्टमध्येे मृत्यू दराचा आलेख रोजच उंचावत आहे.

Nandurbar MH
  • Aug 27 2020 5:22PM
सुदर्शन न्युज  (केतन रघुवंशी) : नंदुरबार  25 ऑगस्ट रोजी दोन पुरुषांचे मृत्यू झाले होते. काल 26 रोजी एका महिलेचा मृत्यू झाला. पाठापाठ आज 27 रोजी सकाळी 9 वाजता तळोदा तालुक्यातील 40 वर्षीय पॉझिटिव महिलेचा मृत्यू झाला. 20 ऑगस्ट पासून ही महिला उपचारार्थ दाखल झालेली होती. तर शहादा येथील 57 वर्षीय पॉझिटिव्ह महिलेचा देखील आज 27 ऑगस्ट रोजी दुपारी मृत्यू झाला. ही महिला 10 ऑगस्ट पासून उपचार घेत होती. दरम्यान, काल 26 ऑगस्ट रोजी दुर्गम धडगाव तालुक्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. धडगाव तालुक्यात  कोरोनामुळे मरण पावलेली व्यक्ती 45 वर्षीय महिला आहे. नंदुरबार, शहादा आणि तळोदा या तीन तालुक्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. मात्र धडगाव हा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला दुर्गम तालुका आतापर्यंत सुरक्षित राहिला होता. दीड महिन्यापूर्वी प्रथमच येथे मध्य प्रदेशातून आलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. धडगाव तालुक्यातून त्यानंतर एकूण 65 स्वॅप घेण्यात आले. त्यात 6 पॉझिटिव आढळले होते. पैकी 3 बरे झाले असून 3 जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाची स्थिती अशी- जिल्ह्यातील एकूण मृत्यू 68,  एकूण घेतलेले स्वँब 8 हजार 287, त्यातील आढळलेले पॉझिटिव्ह 2083, बरे होऊन घरी परतलेले 955  तर उपचार घेत असलेले 1 हजार 55.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार