सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकू; संतप्त प्रहार संघटनेने दिला ईषारा

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात

Nandurbar MH
  • Aug 25 2020 7:37PM
नंदुरबार -  शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असून बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज न देण्याची भूमिका जारी ठेवली आहे. यासह प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवले नाही तर 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेने  दिला आहे.
प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपिन पाटील यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाच्या योजनेला एकप्रकारे केराची टोपली दाखवली आहे. वास्तविक शेतकर्‍यांना पिककर्ज जुलै अखेर मिळणे अपेक्षित होते. परंतु कोविड-१९ चे कारण पुढे करुन बहुतेक बँक अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी सुट्टीचा आनंद लुटला. याबाबतीत सर्वसामान्य नागरीक व शेतकरी होरपळून निघाले आहेत. पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा न करणार्‍या बँकांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे निर्देश जुलै महिन्यातच प्रशासनाला दिले होते. परंतु त्या निर्देशाची कुठलीही अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात झालेली दिसत नाही. आता ऑगस्ट महिना संपत आला असून जिल्ह्यातील बहुतांश शेकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. अशातच सतत पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे नगदी पीकांची परिस्थिती खराब होवून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला असून कपाशी व मिरचीची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पिकांचे पंचनामे त्वरीत सुरु करावेत.  तसेच मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पंचनाम्यांचे अनेक गठ्ठे कृषि विभागाकडे व पिक विमा कंपनीकडे पडून आहेत. त्यात थोड्याफार शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ झाला. परंतू काही शेतकर्‍यांना पात्र असूनही हेतुपुरस्सर पिक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत मागच्या वर्षाच्या वंचित असलेल्या शेतकर्‍यांना पिक विम्याची भरपाई त्वरीत मिळावी, असेही प्रहार संघटनेने म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार