सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ऋषीपंचमीनिमित्त तापीकाठावर स्नानासाठी जाऊ नका; पुरामुळे गावांना 72 तास धोकेदायक*

हतनूर प्रकल्पाचे ३० दरवाजे उघडले असून 1 लाख 1 हजार 474 क्युसेक्स इतका पाणी

Nandurbar.MH
  • Aug 22 2020 9:00PM
नंदुरबार  -  जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे  ३० दरवाजे उघडले असून 1 लाख 1 हजार 474 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. परिणामी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तापी काठावरील गावांना पुढील बहात्तर तास धोक्याचे राहणार असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
        ऋषी पंचमी निमित्ताने महिलांनी तापीनदी काठावर स्नानासाठी जाऊ नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे जिल्हा प्रशासनातर्फे दक्ष राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सजग व सुरक्षित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने  तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 3.00 वाजता सारंगखेडा बॅरेजचे 4 द्वारे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून 62 हजार 408 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे तर प्रकाशा बॅरेजचे 5 द्वारे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून 69 हजार 442 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरिता विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये, असेही म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार