नंदुबार - येथील निझर रस्त्यावर एका आयशर गाडीतून गुरांच्या ढेपेच्या पोत्यांमधून अवैधपणे वाहून आणला जाणारा सुमारे 25 लाख रुपये किमतीचा विमाल गुटका आज भल्या पहाटे पोलीस पथकाने जप्त केला
निझरहून नंदुरबारला गुरांच्या ढेपेतून आणला जाणारा 25 लाखांचा गुटखा पकडला
सुदर्शन न्युज : नंदुबार - येथील निझर रस्त्यावर एका आयशर गाडीतून गुरांच्या ढेपेच्या पोत्यांमधून अवैधपणे वाहून आणला जाणारा सुमारे 25 लाख रुपये किमतीचा विमाल गुटका आज भल्या पहाटे पोलीस पथकाने जप्त केला. तथापि मुख्य सूत्रधारांना अटक कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
गुजरात राज्याच्या हद्दीतील निझर येथे साठा केलेल्या विमल गुटख्याची महाराष्ट्रात बंदी असतांनाही नंदुरबार जिल्ह्यात चोरट्या मार्गाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहतूक केली जाते. याविषयी अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. लॉक डाऊन काळात कडक बंदोबस्त असतानासुद्धा गल्लीबोळात उघडपणे विमाल गुटका उपलब्ध होत असल्याचे दिसले. परंतु हीी गुटका तस्करी करणाऱ्या नंदुरबार आणि गुजरात हद्दीतील सूत्रधारांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. तथापि मिळालेल्या खबरी वरून आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता निझर रस्त्यावर गुरांच्या ढेपीचे पोते ाहून आणणार्या एका आयशर गाडीची पोलीस पथकाने तपासणी केली असता 30 पोत्यांमध्ये 11 लाख 66 हजार 880 रुपये किमतीचे विमल गुटख्याचे 208 पाकिटे आणि दुसऱ्या 30 पोत्यांमध्ये दोन लाख 56 हजार रुपये किमतीचे व्ही वन तंबाखूचे 208 पाकिटे आढळून आले. आयशर गाडी सह जप्त केलेला मुद्देमालाची किंमत 25 लाख रुपये नोंदवण्यात आली आहे. भास्कर विजय भोसले राहणार राहुरी जिल्हा अहमदनगर व मोहम्मद मद अजहरुद्दिन शकील शेख राहणार नागापूर जिल्हा अहमदनगर या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांबरोबरच निझर येथील गोडाऊन मालक भावेश उर्फ शीतल अग्रवाल राहणार निजर व मोहन सिंिंग पटेल अशा चार जणांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश पंडित व अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक किशोर नवले, हेडकॉन्स्टेबल मुकेश तावडे राकेश मोरे पोलीस नाईक राजेश वसावे दादा मासुळे आदींचा पथकामध्ये समावेश होता.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प