सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारच्या 16 लाखाच्या लुटीचा छडा लागला? चार संशयीत चौकशीच्या जाळ्यात

नंदुरबार - येथील बांधकाम व्यवसायिक जैन यांच्या कार्यालयात

Nandurbar MH
  • Aug 19 2020 7:27PM
सुदर्शन न्युज नंदुरबार - येथील  बांधकाम व्यवसायिक जैन यांच्या कार्यालयात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दोन जणांनी 15 लाख 80 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना आज भर सकाळच्या प्रहरी घडली आणि सारे नंदुरबार हादरून गेले. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या आठ तासात पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात यश मिळाल्याचे समजते.  पोलिसांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसून या बांधकाम व्यावसायिकाच्या  संपर्कातील कर्मचाऱ्यांनी सर्व बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याचे कळते.
लोखंडी टॉमी बनवणाऱ्या पंचाळाची तपासणी केल्यामुळे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यामुळे पोलिसांना धागा मिळाला. याच बरोबर डीएसके कॉम्पलेक्समध्येही राजपूत नामक व्यापाऱ्याच्या दुकानातून चार लाखाची रोकड चोरीस गेली आहे. त्याचाही तपास लागला आहे. दरम्यान लुटमारीची घटना आज बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजे दरम्यान गणपती मंदिर परिसरातील नंदुरबार शहरातील प्रसिद्ध जमीन विकासक तथा शिवसेनेचे पदाधिकारी देवेंद्र जैन यांच्या डी.सी.डेव्हलपर्स या कार्यालयात घडली. आजच्या घटनेचा एकमेव साक्षीदार जैन यांच्या दुकानातील एक उमेदसिंग नामक कर्मचारी आहे. त्याने पोलिसांना व जैन यांना सांगितलेल्या घटना क्रमानुसार आज दि.१९ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन सशस्त्र दरोडेखोर घुसून आले व पिस्तूलचा धाक दाखवत त्याला बांधून ठेवले. त्यांनी सोबत आणलेल्या लोखंडी टॉमीने कपाट फोडून 15 लाख 80 हजार रुपये काढून लगेचच पलायन केले. उमेशसिंग याने कशीबशी सुटका करून घेत आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले तेव्हा अधीक्षक महेद्र पंडित, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक किशोर नवले, शहर पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मागील बाजुच्या रस्त्यापर्यंत माग दाखवला. पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. लोखंडी टॉमी बनवणाऱ्या पंचाळाची तपासणी केल्यामुळे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यामुळे पोलिसांना धागा मिळाला व त्या आधारे चौकशी करताना यांच्याकडील जैन यांच्याकडे  पूर्वी कामाला असलेल्या एकाने हा बनाव रचल्याची कबुली दिली असल्याचे समजते. अधिक तपास चालू असल्याने पोलिसांकडून याविषयी अध्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सायंकाळच्या ताज्या माहितीनुसार चार तरुणांचा यात सहभाग  असल्याचा संशय असून चारही संशयित राजस्थान राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचेे समजते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार