सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार:मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचा पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार जगभरात कोवीडचे संकट असतांना या संकटाच्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी

Nandurbar MH
  • Aug 17 2020 5:38PM
नंदुरबार- जगभरात कोवीडचे संकट असतांना या संकटाच्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी स्मित हॉस्पीटल अल्प काळात उभे राहिले, हे कौतूकास्पद आहे. कोवीडवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र ही लढाई एकट्या  शासनाने लढायची नाही. खासगी हॉस्पीटलने देखील कोवीडशी सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. शासनाच्या हॉस्पीटलला पर्याय म्हणूनच या स्मित हॉस्पीटलकडे पाहायला हरकत नाही. अत्यंत सुंदर व अद्ययावत हॉस्पीटलची जिल्ह्याला गरज होती. शासनाला उत्तम पर्याय म्हणून हे हॉस्पीटल भविष्यात यशस्वी होईलच याची मला खात्री आहे, असेे प्रतिपादन पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी केले. शहरातील कोरीट नाक्याजवळील स्मित हॉस्पीटल हे कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ऍड.सिमा वळवी, आमदार शिरीष नाईक, आमदार राजेश पाडवी, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, माजीमंत्री ऍड.पदमाकर वळवी, सभापती रतन पाडवी, माजी सभापती सी.के.पाडवी, कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कोवीड सेंटरला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसूमना पंत, जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ.रघुनाथ भोये, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदेे, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदींनी भेट देऊन पाहणी केली.
ऍड.के.सी पाडवी पुढे म्हणाले, सदर हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन जनरेटर प्लांट उभारुन आधुनिकतेचा परिचय दिला आहे. यामुळे या हॉस्पीटलमध्ये कोवीड रुग्णांसाठी ऑक्सीजनची सुविधा २४ तास मिळणार आहे, हे सर्वात महत्वाचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोवीडचे प्रमाण वाढत आहे. शासकीय यंत्रणा कोवीडवर नियंत्रण करण्यासाठी परीश्रम घेत आहे. मात्र अनेक रुग्णांना खाजगी हॉस्पीटलमध्ये जावेसे वाटते. रुग्णांना उत्तम असा पर्याय आता स्मित हॉस्पीटल असणार आहे. या हॉस्पीटलला शासनाकडून काही मदत लागल्यास निश्चित दिली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी कोवीड केअर सेंटरची पाहणी केल्यानंतर लवकरच कार्यान्वित होणार्‍या सर्व सुविधायुक्त चार ऑपरेशन थिएटर, १०० बेड, १६ बेडेड आयसीयु, पॅथोलॉजी लॅबची पाहणी केली. तसेच अत्याधुनिक हॉस्पीटलमध्ये स्वच्छता पाहून ते चांगलेच भारावले. जवळपास अर्धातास हॉस्पीटलची पाहणी करुन सर्वच संचालकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. व उर्वरित सुविधा देखील लवकरात लवकर पुर्ण करुन एक परिपूर्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल कार्यान्वित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. तर आभार डॉ.अविनाश पाटील यांनी मानले. संचालक डॉ.रोशन भंडारी, डॉ.विजय पटेल, डॉ.त्र्यंबक पटेल, डॉ.गौरव तांबोळी, डॉ.स्वप्नील महाजन, डॉ.अविनाश पाटील, डॉ.शब्बीर मेमन, संचालक डॉ.विशाल चौधरी आदींनी उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार