महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्री ad K.C. पाडवी व खासदार हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन
महिला व बालविकास
सुदर्शनन्युज : नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरातील महिला व बालविकास भवनाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ यांची कार्यालये एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणे सोईचे होण्यासाठी हे भवन कार्यान्वित करण्यात आले आहे:
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी बापूराव भवाने यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले व भवनाविषयी माहिती दिली.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी आणि जि.प.चे पदाधिकारी उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प