सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निवासी उपजिल्हाधिकारी गोगटे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निरोप

निवासी उपजिल्हाधिकारी

Nandurbar MH
  • Aug 13 2020 10:52AM
सुदर्शन न्युज नंदुरबार : निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची पदोन्नतीने अमरावती येथे उपायुक्त (रोहयो) पदावर बदली झाल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे निरोप देण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या  उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, महेश सुधळकर, बबन काकडे, संदीप कदम  आदी उपस्थित होते.
श्री.गोगटे यांनी आस्थापना विषयाची अनेक प्रकरणे मार्गी लावली आणि गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली, असे डॉ.भारुड यावेळी म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी हा प्रशासनातील महत्वाचा दूवा असून ती भूमीका गोगटे यांनी चांगल्या प्रकारे निभावली असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.गोगटे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, नुतन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वांच्या सहकार्याने नवी जबाबदारी चांगल्यारितीने पार पाडण्याचा प्रयत्न राहील, असे श्री.खांदे यावेळी म्हणाले. श्री.काकडे, तहसीलदार उल्हास देवरे, गोकुळ पाटील, हेमंत देवकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व गोगटे यांना शुभेच्छा दिल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार