नंदुरबार: आज जिल्ह्यातील 50 हून अधिक रुग्ण कोरोना मुक्त
आरोग्य विभाग
सुदर्शन न्युज नंदुरबार - जिल्ह्यातील 50 हून अधिक रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. तपासणीला वेग मिळाल्यामुळे रुग्ण वाढीची संख्या अधिक झाली असतानाच आता कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.
मृतांची संख्या आता एकूण 47 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित संख्या 859, बरे झालेले 560, उपचार घेत असलेले 206, स्वँबसंख्या 5000, प्रलंबित तपासणी अहवाल 169, अशी आज 11 ऑगस्ट अखेरची स्थिती आहे. दरम्यान, कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्याची गरज असून त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे.नंदुरबार व शहादा येथील कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्यात येत आहे. नवापूरात स्वॅब नमुने घेण्यासाठी जनतेच्या सोईची जागा निश्चित करणे, नवापूरला कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्राथमिक तयारी करणे, अक्कलकुवा येथे देखील दोन दिवसात केंद्र सुरू करणे, नंदुरबार येथील शासकीय महिला रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती तात्काळ करणे, रुग्णालयासाठी आवश्यक बाबींची पूर्तता तात्काळ करणे यावरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, नवापूर, चिंचपाडा आणि नंदुरबार येथे खाजगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे अशा विविध विषयांवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी नुकताच आढावा घेतला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प