सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*सर्व व्यवसायांना सरसकट दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी देण्यासंदर्भात मुख्य सचिवांना पत्र देणार- जिल्हाधिकारी यांचे व्यापारी महासंघाचा शिष्टमंडळाला आश्वासन*

नंदुरबार: कोरोना महामारीचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्रात सर्व प्रथम नंदुरबार जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले ते पंधरा दिवस संपत नाही त्यावेळी राज्य शासनाने आधी १५ दिवस व पुन्हा १५ दिवसाचे लॉकडाऊन घोषित केले.

Nandurbar MH
  • May 11 2021 8:17AM
सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी

नंदुरबार: कोरोना महामारीचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्रात सर्व प्रथम नंदुरबार जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले ते पंधरा दिवस संपत नाही त्यावेळी राज्य शासनाने आधी १५ दिवस व पुन्हा १५ दिवसाचे लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे सर्व सामान्य व्यापारी सर्वच बाजूने अडचणीत आला आहे. गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी होत असलेले लॉकडाऊनमुळे व्यापारी, दुकानांमध्ये काम करणारे माणसे यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.तरी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने सर्व व्यवसाय सरसकट दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवावे अश्या आशयाचे निवेदनावर व्यापारी महासंघाने शिष्टमंडळाने दिले असता जिल्हाधिकारी यांनी सर्व व्यवसायांना सरसकट दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी देण्यासंदर्भात मुख्य सचिवांना पत्र देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
व्यापारी महासंघाने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,प्रशासनालाने वेळोवेळी काढलेल्या आदेशाप्रमाणे व्यापारी वर्गाने प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे, देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीमध्ये व्यापारी शासन- प्रशासन सोबत भक्कमपणे उभा असतो. आता अशी परिस्थिती आली आहे की, व्यापारीच मोठ्या अडचणीत सापडला आहे, दुकानाचे भाडे, व्यापारासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते, वीजबिल, कामगारांचा पगार आणि परिवाराच्या उदरनिर्वाह व इतर व्यावहारिक गरजा या सर्व गोष्टी बघता व्यापाऱ्यांचा अडचणी प्रशासनाने समजून घेऊन न्याय देणे अपेक्षित आहे.आता नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे, तरी प्रशासनाने सर्व व्यवसायांना सरसकट दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी देऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनातून केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी यांनी वरील आश्वासन दिले. निवेदनावर  जिल्हा व्यापारी महा संघ ,हाट दरवाजा किराना  व्यापारी एसोसिएशन ,मंगल बाजार किराना व्यापारी एसोसिएशन ,
नंदूरबार क्लॉथ मर्चेंट , नंदूरबार स्पेयर्स पार्ट्स एसोसिएशन , सराफ बाजार एसोसिएशन, नंदूरबार इलेक्टिकल एंड सर्विसेज,  फर्नीचर व्यापारी एसोसिएशन आदींचा स्वाक्षरी आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार