सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभालरंभ

ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभालरंभ

Sudarshan MH
  • Jan 16 2021 6:28PM
नंदुरबार - राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी निलीमा वळवी यांनी पहिली लस घेतली.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक  तथा राज्य शासनाचे सल्लागार  डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलता पालकमंत्री पाडवी म्हणाले, देशाच्यादृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे  लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...असे सुरू झाले लसीकरण
लसीकरणाचेवेळी कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत फुग्यांनी  सजविले होते. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना  लस देण्यात येत आली. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंददेखील घेण्यात आली. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना 30 मिनीटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
जिल्हा रुग्णालयासह अक्कलकुवा आणि म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणास सुरुवात झाली. या चारही केंद्रावर दररोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे 75 कुप्या (750 डोस), म्हसावद 170 (1700 डोस), नवापूर 85 (850 डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या 120 कुप्या (1200 डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार