सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: टॉयलेट कमोडवर लिहिलंय हिंदुस्तान; रेल्वे विभागाकडून होतेय अक्षम्य दुर्लक्ष

नंदुरबार - विविध रेल्वे स्थानकांवरील शौचालयात रेल्वे विभागाने

Nandurbar. MH
  • Feb 3 2021 4:57PM
 
नंदुरबार - विविध रेल्वे स्थानकांवरील शौचालयात रेल्वे विभागाने लावलेल्या टॉयलेट कमोडवर हिंदुस्तान (Hindustan) असे ठळक इंग्रजी अक्षरात लिहलेले आहे. ज्या कमोडवर शौच केली जाते त्यावर देशाचे नाव लिहणे म्हणजे देशाचा घोर अपमान आहे. ते त्वरित काढून टाकावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हिंदु सेवा सहाय्य समितीने दिला.
 
रेल्वे विभागाने चालवलेल्या या अक्षम्य प्रकाराबद्दल संतप्त जनभावना व्यक्त होत आहेत. नंदुरबार रेल्वे स्थानक उद्घाटना निमित्त पश्चिम रेल्वेचे महाप्रबन्धक अलोक कंसल हे काल मंगळवार रोजी नंदुरबार येथे आले होते. त्याप्रसंगी या मागणीचे निवेदन समितीच्यावतीने देण्यात आले. हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, जितेंद्र मराठे, राजू चौधरी, चेतन राजपूत आदी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, आपल्या देशाला हिंदुस्थान नावानेही संबोधले जाते हे सर्वश्रुत आहे. ज्या पात्रात शौच किंवा लघवी केली जाते त्याठिकाणी हिंदुस्थान हा शब्द लिहणे म्हणजे समस्त देशवासियांचा अपमान आहे. हिंदुस्थान जिंदाबाद असा नारा देऊन शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देखील अपमान आहे. हिंदुस्थान नाव लिहल्याने देशाच्या नावाबरोबरच समस्त हिंदु धर्मीयांचाही घोर अपमान आहे. सर्व रेल्वे स्थानकांवरील, रेल्वे कार्यालयांमधील तसेच रेल्वे गाड्यांमधून हिंदुस्थान लिहलेले कमोड त्वरित हटवावे, एक महिन्याच्या आत ही कारवाई पूर्ण न झाल्यास हिंदु सेवा सहाय्य समितीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अधिवक्ता यांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. तरी भारतभरातील जेथे जेथे या नावाचे कमोड लावले आहेत, ते सर्व काढण्याचे आदेश द्यावे अश्या आशयाचे निवेदन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना मेलवर पाठविले आहे.
 
-----

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार