सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता नाही; एकत्रित नमाजला मनाई तसेच जनावरांचे बाजार देखील बंद

नंदुरबार- अखेर महाराष्ट्र शासनाने बकरी ईद विषयी मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे जारी केल्या आहेत.

Nandurbar MH
  • Jul 9 2021 10:01PM

नंदुरबार-  अखेर महाराष्ट्र शासनाने बकरी ईद विषयी मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे जारी केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  "बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, जनावरांचे बाजार बंद राहतील, असे त्यात म्हटले असून बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही, असेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
             बकरी ईद-२०२१ बाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने परिपत्रक जारी केले असून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम,
सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणत एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. या वर्षी दि. २१ जुलै, २०२१ रोजी "बकरी ईद" (चंद्र दर्शनावर अवलंबून असून ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्यामुळे "बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. 
पुढे म्हटले आहे की, सुरक्षित अंतर ठेवण्या विषयीचे तसेच साखळी खंडित करण्याच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले ४ जून २०२१ आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असेही शेवटी म्हटले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार