सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणीचे 5 व 6 ऑक्टोबर रोजी आयोजन

नंदुरबार, दि.27 : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा देणे

Nandurbar MH
  • Sep 27 2021 12:44PM


नंदुरबार, दि.27 : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक  दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा देणे तसेच क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व आर्मी स्पोर्टस इन्टिंट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथे प्रवेश देण्यासाठी नंदुरबार येथे 5 ते 6 ऑक्टोंबर 2021 रोजी क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा नैपुण्य चाचणीच्या प्रवेशासाठी 1 जानेवारी 2022 रोजी मुलाचे वय 8 ते 14 वर्षे असणे आवश्यक असेल. डायव्हिंग खेळासाठी 8 ते 12 वर्षे वयोगट तर ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग करीता 10 ते 14 वर्षे वयोगटातील फक्त मुले या चाचणीत सहभाग घेवू शकतात.
 
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, खामगाव रोड,साक्री नाका, नंदुरबार येथे संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त खेळांडूनी याचाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार