सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लघु उद्योगासाठी जिल्हा पुरस्कार योजना-2021

नंदुरबार, दि.11 : जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग संचालनालय मुंबई यांचेमार्फत जिल्हा पातळीवर पुरस्कार योजना राबविण्यात येते.

Nandurbar MH
  • Jan 11 2022 2:02PM


नंदुरबार, दि.11  : जिल्ह्यातील लघु उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग संचालनालय मुंबई यांचेमार्फत जिल्हा पातळीवर पुरस्कार योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील उत्कृष्ट लघुउद्योग घटकांना प्रथम पुरस्कार रुपये 15 हजार रोख व गौरवचिन्ह आणि द्वितीय पुरस्कार रुपये 10 हजार रोख व गौरवचिन्ह असे दोन पुरस्कार देण्यात येतात.  उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये लघु उद्योग घटक म्हणून नोंदणीकृत झालेला व कमीत कमी दोन वर्ष सलग उत्पादन करीत असणारा,बँकेचा थकबाकी नसलेला लघु उद्योग घटक या योजनेत भाग होऊ शकतो.

सन 2021 च्या पुरस्काराकरीता उद्योग घटक 1 जानेवारी 2017 पुर्वी स्थाई नोंदणीकृत अथवा ईएम भाग-2 घेतलेला असला पाहिजे. पुरस्काराच्या निवडीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे पात्र उद्योग घटकास प्रथम व द्वितीय पुरस्कार देण्यात येईल.

अर्जाच्या नमुन्यासाठी व पुरस्काराच्या सविस्तर माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार या कार्यालयात कार्यालयीन वेळेत व्यक्तीश: अथवा ईमेल [email protected] वर संपर्क साधावा.  परिपुर्ण भरलेले अर्ज महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार