सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धांद्रे बु. येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

नंदुरबार दि.4: शहादा तालुक्यातील मौजे धांद्रे बु. येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शिवदास ज्योतेसिंग चित्ते यांचे विरुद्ध दाखल

Nandurbar MH
  • Aug 4 2021 1:40PM


नंदुरबार दि.4: शहादा तालुक्यातील मौजे धांद्रे बु. येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शिवदास ज्योतेसिंग चित्ते यांचे विरुद्ध दाखल झालेल्या तसेच 20 डिसेंबर 2019 रोजी तीन चतुर्थश मताने मंजूर झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांद्रे ब्रु. येथे 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष ग्रामसभा घेणेकरीता प्रचलित नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक राहील. आवश्यकता असल्यास सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करणेकामी गुप्त मतदान घेण्यात येईल. यासाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरुन 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. या दिवशी विशेष ग्रामसभेत फक्त अविश्वास ठरावावर चर्चा होईल इतर विषयांवर चर्चा होणार नाही.

विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला आहे असे समजण्यात येईल. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील. 

विशेष ग्रामसभेत कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. ग्रामसभेमध्ये येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक राहील असे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार