सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

नंदुरबार दि.2 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे.

Nandurbar MH
  • Oct 3 2021 8:19AM


नंदुरबार दि.2 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी  जाहीर करण्यात आली आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदार कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदी सर्वांना लागू राहील. यात खासगी कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे,व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या,  शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर आणि अन्य आस्थापनांचा देखील समावेश आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी ऐवजी दोन तासाची सवलत देता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असेल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना दोन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता सर्व आस्थापनांनी घ्यावी. असे उपजिल्हाधिकारी ( महसुल प्रशासन ) तथा नोडल अधिकारी जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूक, कल्पना निळ-ठुबे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार