सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत वेबिनारचे आयोजन

नंदुरबार : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत 29 जुलै 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता झुम ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.

Nandurbar MH
  • Jul 28 2021 12:43PM


नंदुरबार :  जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांच्यामार्फत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबाबत 29 जुलै 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता झुम ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यरत असून बारावी विज्ञान तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी तसेच मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणारे उमेदवारांना समिती मार्फत जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करुन  अर्जदारांना 1 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने वैधता प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र अर्जदारांना अर्ज करतांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे 29 जुलै 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता वेबिनारच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
 
सदर वेबिनार झूम ॲपवर होणार वेबिनारची लिंक  https://us05web.zoom.us/j/9016721355? Pwd=WnRBSHVuVld0K1c3SkQ5NXZBWUNjQT09 अशी असून मीटिंगचा आयडी- 901 672 1355 व पासवर्ड- क्यूएक्सक्यूएमशून्य डब्ल्यु (QxqM0w) असा आहे. तरी  प्राचार्य, कर्मचारी, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यवसायिकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जदारांनी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिव  राकेश पाटील यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार