सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुष्पगुच्छ ऐवजी महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंना प्राधान्य देणार, नूतन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचा निर्णय

नंदुरबार : महिला जिल्हाधिकारी म्हणून माझे वेगळेपण ठेवण्यासाठी महिलांना रोजगार देणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने माहिती घेणे चालू आहे.

Nandurbar MH
  • Jul 13 2021 11:40AM

नंदुरबार : महिला जिल्हाधिकारी म्हणून माझे वेगळेपण ठेवण्यासाठी महिलांना रोजगार देणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने माहिती घेणे चालू आहे. तथापि शासकीय कार्यालयातून सत्कार व सन्मान करताना पुष्पगुच्छ वापरण्या ऐवजी महिला बचत गटांनी केलेल्या वस्तू भेट देण्याची प्रथा सुरु करण्यास सांगितले आहे; अशी माहिती नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज पत्रकारांशी संवाद करतांना दिली.
        नंदुरबार जिल्ह्याला लाभलेल्या त्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. येथील जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांची पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथील आदिवासी आयुक्तालयाच्या अपर आयुक्त मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज आज सोमवार 12 जुलै रोजी 11 वाजता नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पगुच्छ देवून श्रीमती खत्री यांचे स्वागत केले.  यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, बालाजी क्षिरसागर, शाहुराज मोरे, संजय बागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात  आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री यांनी बीए, एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून त्या हरियाणातील सोनपत गावाच्या आहेत.  त्या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी अपर आयुक्त आदिवासी आयुक्तालय नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी पाचोरा या पदावर काम केले आहे. मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यासंदर्भात श्रीमती खत्री यांनी विशेष उपक्रम  राबविले आहेत. पदभार घेतल्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मेळघाट प्रमाणेच येथील कुपोषण संदर्भात विविध योजनांचा अभ्यास करून एकत्रित अंमलबजावणी करण्यावर आपला भर राहील असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील प्रश्न आणि समस्या पत्रकारांकडून त्यांनी जाणून घेतल्या. सर्व संबंधित गोष्टींची माहिती घेऊ, अभ्यास आणि पाहणी दौरा केल्यावर येत्या काही दिवसात प्राधान्याने सुधारणा करू; असेही त्या म्हणाल्या.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार