सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ई-पीक पाहणीचा शेतकऱ्यांना लाभ कार्ली, मांजरे येथे शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन

नंदुरबार दि.30 : शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत महसूल यंत्रणेकडून मार्गदर्शन करण्यात येत असून नंदुरबार तालुक्यातील कार्ली व मांजरे येथे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या कार्यक्रमाची माहिती दिली.

Nandurbar MH
  • Aug 31 2021 6:25PM


नंदुरबार  दि.30 : शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत महसूल यंत्रणेकडून मार्गदर्शन करण्यात येत असून नंदुरबार तालुक्यातील कार्ली व मांजरे येथे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या कार्यक्रमाची माहिती दिली.

श्री.थोरात यांनी दोन्ही गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ई-पीक पाहणी प्रणालीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक पाहणीची जलद वस्तुनिष्ट आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकपेरा नोंदीसाठी होणाऱ्या श्रमाची व वेळेची बचत होईल. या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक खातेदाराची प्रमाणित माहिती उपलब्ध होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या मोबाईलमध्ये ‘ई-पीक’ पाहणी ॲप डाऊनलोड करुन आपल्या शेतातील पिकाची अचून नोंद करावी. शेतकऱ्यांना ॲपचा वापर करण्यात अडचण येत असल्यास तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा,  असे आवाहन त्यांनी केले.

नंदुरबार तालुक्यात 155 गावातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीसाठी ॲपचा उपयोग सुरू केला असून 6 हजार 672 खातेदारांनी आपला पिक पेरादेखील व्यवस्थितरित्या पोर्टलवर अपलोड केला आहे. उर्वरीत 340 खातेदारदेखील लवकरच पीक पाहणी अहवाल अद्यावत करतील.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार