सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते किटकनाशकाबाबत जनजागृतीचा शुभारंभ

नंदुरबार दि.24: किटकनाशकांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

Nandurbar MH
  • Aug 24 2021 6:56PM


नंदुरबार  दि.24: किटकनाशकांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

मोहिमेअंतर्गत किटकनाशकांची हाताळणी, किटकनाशकामुळे विषबाधा होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सुरक्षा कीटचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे. मोहिमेअंतर्गत 8 किटकनाशक उत्पादक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी अदामा इंडिया प्रा.लि. कंपनीस नोडल कंपनी नेमण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार