सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नर्मदाकाठच्या गावांना औषधांचा वेळेवर पुरवठा करा-मनीष खत्री

नंदुरबार दि.18: नर्मदा काठावरील गावांना आवश्यक औषधांचा पुरवठा वेळेवर करण्यात यावा

Nandurbar MH
  • Aug 19 2021 8:50AM


नंदुरबार  दि.18: नर्मदा काठावरील गावांना आवश्यक औषधांचा पुरवठा वेळेवर करण्यात यावा आणि आरोग्य केंद्राच्या ठिकाणी न रहाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गाभा आणि नवसंजीवनी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, प्रतिभा शिंदे, डॉ.कांतीलाल टाटीया, लतिका राजपूत आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या, मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना देण्यात आलेल्या बुडीत मजूरीच्या रकमेची वर्षनिहाय माहिती सादर करावी. 102 रुग्णवाहिका सेवेबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नवसंजीवनी योजनेअंतर्गत गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत घ्यावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार