सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

नंदुरबार दि.18: केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिलासंबंधी उल्लेखनीय कामकाज केलेल्या व्यक्तींना तसेच संस्थांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो.

Nandurbar MH
  • Jan 18 2022 1:03PM

नंदुरबार  दि.18: केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत  महिलासंबंधी उल्लेखनीय कामकाज केलेल्या व्यक्तींना तसेच संस्थांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार हा वैयक्तीक व संस्थेसाठी आहे.

 पुरस्कारासाठी लाभार्थ्यांचे वय 1 जून 2021 रोजी 25 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे. संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्थेस महिलासंबंधी कामकाजाचा किमान 5 वर्ष अनुभव असावा. अर्जदार यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार प्राप्त नसावी. जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच संस्थांनी आपले अर्ज www.awards.gov.in  या वेबसाईटवर 31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार