सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

नंदुरबार दि.13: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर आयोजित कौशल्य विकास स्पर्धेत युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

Nandurbar MH
  • Aug 13 2021 7:52PM

नंदुरबार  दि.13: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर आयोजित  कौशल्य विकास स्पर्धेत युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

 दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होतात. त्याकरीता जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्यस्तरावर परीक्षा होवून निवड झालेल्या उमेदवाराची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. या स्पर्धासाठी ‘महास्वयंम’ पोर्टलवर सन 2019-2020 दरम्यान  नोंदणी करण्यात आलेली होती. परंतू, कोरोनामुळे स्पर्धा कार्यक्रमाला स्थगीत दिली होती.

  शासनाने जिल्हास्तरावरील स्पर्धा 17 व 18 ऑगस्ट तर विभागीय स्तरावरील स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट तसेच 3,4 आणि 5 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरावरील स्पर्धा घेण्याचे निश्चित केलेले आहे. यापूर्वी  कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी न केलेल्या उमेदवारांनादेखील 15 ऑगस्टपर्यंत 'महास्वयंम' पोर्टलवरील लिंकद्वारे नोंदणी करता येणार आहे. 

 स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नंदुरबार अथवा प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. नंदुरबार जिल्ह्याकरीता मनोहर अहिरे (भ्रमणध्वनी क्रमांक 9011978225 ) व तालुकास्तरावर  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रचार्यांशी संपर्क साधावा.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार