सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला12 हजार डोस प्राप्त; आज लसीकरणाचा शुभारंभ

नंदुरबार - कोविड-19 च्या प्रतिबंधीत लसीकरणासाठी

Nandurbar MH
  • Jan 16 2021 6:43AM
जिल्ह्याला 12 हजार 410 डोस प्राप्त प्राप्त झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या लसीकरणाचा शुभारंभ आज 16 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री एडवोकेट के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 4 आरोग्य संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 3 आरोग्य संस्थांमध्ये 4 जानेवारी 2021 रोजी ड्राय रन घेण्यात आला होता. जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार, उपजिल्हा रुग्णालय, नवापूर
ग्रामीण रुग्णालय, म्हसावद, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा या आरोग्य संस्था लसीकरणासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. 10 हजार 857 लाभार्थींची नोंदणी पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे 14, फ्रंटलाईन वर्कर्स 1979, लसीकरणासाठी नेमणूक करण्यात आलेले 40 अधिकारी, कर्मचारी यांचा यात समावेश आहे.
     फक्त 18 वर्षावरील लाभार्थीच लसीकरणासाठी अपेक्षित धरण्यात आले आहेत. लाभार्थीमधील दुर्धर आजारी, गरोदर व स्तनदा माता यांना लसीकरणामधून वगळण्यात आले आहे. लसीमुळे होणाऱ्या गुंतागुंतीचे नियोजनासाठी जिल्हा रुग्णालय येथे स्वंतत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर संभाव्य लसीचा गुंतागुंतीच्या प्राथमिक उपचारासाठी AEFI किट तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी व AEFI साठीचे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्व लसीकरण केंद्रासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर AEFI झाल्यास त्या लाभार्थ्यांस तत्काळ जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यासाठी 108 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. 
  प्रत्येक लसीकरण केंद्रावर दरदिवशी 100 लाभार्थींना लसीकरण करण्यात येईल. सर्व लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार 15 जानेवारी 2021 अखेर लस साठा व प्रसिध्दी साहित्य पोच करण्यात आले आहे.
000000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार