सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: वेडसर महिलेला वाचवण्याचा प्रयत्नात दुचाकीस्वाराच्या वडिलांचा जागीच म्रुत्यू; महिलेचाही रुग्णालयात म्रुत्यू*

नंदुरबार - अचानक समोर आलेल्या वेडसर महिलेला

Nandurbar. MH
  • Apr 16 2021 6:43AM
नंदुरबार - अचानक समोर आलेल्या वेडसर महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकल चालकाचे वडील जागीच मरण पावले तर त्याच्यासोबतचा मित्र जायबंदी झाला. दरम्यान उपचार घेताना ती वेडसर जखमी महिलाही आज सिव्हिल हॉस्पीटल येथे मरण पावली.
     पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 14 एप्रिल 2021 रोजी रामा भिका चौरे यांना घेऊन त्यांचा मुलगा सुनिल चौरे हा त्यांचे मित्र साईदास राठोडसह मोटरसायकलने नंदुरबारकडे जात होते. तेव्हा रात्री 8.30 वाजता नंदुरबार ते आष्टे रोडवर पिंप्री फाट्याजवळ समोर एक वेडसर महिला रोडावर आल्याने तिला वाचवण्यासाठी ब्रेक मारला. पण ब्रेक मारताच मोटर सायकल स्लिप होवुन रोडावर तिघेही पडले. पडल्याने सुनीलचे वडील रामा भिका चौरे हे जागीच मयत झाले. सोबतचा मित्रही जबर जखमी झाला. शिवाय जिला वाचवण्याचा प्रयत्न केला ती वेडसर महिलाही गंभीर जखमी झाली. मदतीला धावून आलेल्या लोकांनी त्या महिलेसह तिघांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी 15 एप्रिल 2021 रोजी सुनिल रामा चौरे वय 27 वर्षे रा. विद्यानंद पार्क, दुधाळे शिवार, नंदुरबार यांनी फिर्याद दिली. तथापि ती वेडसर जखमी महिलाही आज सिव्हिल हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान मयत झाली. तिची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार