नंदुरबार - शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाचे लोखंडी शटर तोडून चोरीस गेलेल्या दुधाच्या 1 लाख रुपये किमंतीच्या 100 स्टीलच्या कॅन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा शहरातील दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघ लि. शहादा येथील कार्यालयाचे मागील लोखंडी शटर तोडून दुध संकलनासाठीचे 1 लाख रुपये किमंतीचे 100 स्टीलचे कॅन दिनांक 5 ते 6 जुलै 2021 दरम्यान चोरीस गेले होते. दुध उत्पादक व कृषीपुरक उद्योग सहकारी संघाच मॅनेजर उध्दव भबुता पाटील रा. श्रीकृष्ण कॉलनी, शहादा यांनी त्याविषयी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हा शेतकरी संदर्भात असल्याने पोलीस अधीक्षक पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी गुन्हेगारांना शोधून सर्व मुद्देमाल परत मिळविणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश दिले.
त्या अनुषंगाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. दुध उत्पादक संघ येथे झालेली चोरी मलोणी ता.शहादा येथील विशाल याने 5 ते 6 साथीदारांच्या मदतीने केली असून तो सद्या मलोणी परीसरातच फिरत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ मलोणी येथे जावून विशाल यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नांव विशाल भगवान ठाकरे वय 20 रा. समता नगर, मलोणी ता.शहादा जि नंदुरबार असे आहे. अविनाश काशिनाथ सामुद्रे वय 21 रा. लहान शहादा, राजेश ब्रिजलाल भिल वय 19 रा. लहान शहादे, रविंद्र भगवान भामरे वय 18 रा. समतानगर, मलोणी यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. चोरीस गेलेले दुधाचे सर्व कॅन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक राकेश मोरे पोलीस अमंलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, सतिष घुले यांचे पथकाने केली असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333