सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार:लाच घेतांना पुरवठा निरिक्षकाला अटक*

नंदुरबार - रेशनकार्ड आधार संलग्न करण्याच्या मोबदल्यात रेशन दुकानदाराकडून आठ हजार रुपयाची लाच घेताना पुरवठा

Nandurbar. MH
  • Apr 6 2021 6:36AM
नंदुरबार - रेशनकार्ड आधार संलग्न करण्याच्या मोबदल्यात रेशन दुकानदाराकडून आठ हजार रुपयाची लाच घेताना पुरवठा निरीक्षकाला नंदूरबारच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना नवापुरात घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तिच्या मामाचे रेशन दुकान आहे. शासकीय कामात दुकानदाराला ते नेहमी मदत करतात. सध्या शासनाने रेशन दुकानातील खातेदारांचे रेशनकार्ड आधार कार्डाशी जोडणे बंधनकारक केले असल्याने सदरच्या कामासाठी हे नवापूर तहसील कार्यालयात गेले. तिथे पुरवठा निरीक्षक रवींद्र निंबा कानडे यांना भेटले. तेव्हा निरीक्षक कानडे यांनी रेशन कार्ड
आधारकार्डाशी जोडणेसाठी एका रेशन दुकानाचे 
1000 ₹ याप्रमाणे दोन्ही दुकानाचे 2000 ₹ व 4 महिन्याचे एकूण 8000 ₹ स्वतःच्या आर्थिक लाभासाठी मागितले. म्हणून या याविषयीची तक्रार सदर व्यक्तीने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून पंच व साक्षीदार यांच्या समक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा नोंदवून आरोपीस नवापूर येथून ताब्यात घेण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव, पोलीस उप अधीक्षक शिरीष जाधव, हेड कॉन्स्टेबल महाजन पोलीस नाईक दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिर, ज्योती पाटील यांचा पथकात समावेश होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार