सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबा: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयातर्फे 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवून रिक्तपदे अधिसूचित केली आहेत.
दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीका आदी विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी 02564/210026 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मेळावा ऑनलाईन असल्याने कार्यालयात किंवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहू नये. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.