सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकूल योजनेचा लाभ गरजू नागरिकांना देण्यासाठी तालुका स्तरावर मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

घरकूल योजनेबाबत तालुकास्तरावर मेळाव्यांचे आयोजन करावे-राधाकृष्ण गमे

Nandurbar MH
  • Dec 17 2020 11:42AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार  - केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकूल योजनेचा लाभ गरजू नागरिकांना देण्यासाठी तालुका स्तरावर मेळाव्यांचे आयोजन करण्यात  यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त डी.डी.शिंदे, अरविंद मोरे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, भुपेंद्र बेडसे, सर्व खाते प्रमुख आणि गट विकास अधिकारी उपस्थित होते.

श्री.गमे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकूल योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकूलांचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. पात्र लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ देण्यासाठी महाआवास अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. घरकूल बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे.  यासाठी सर्व यंत्रणेने एकजूटीने काम करावे.

कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करताना एकही बालक सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. माता आणि बालकांच्या पोषणाबाबत जनजागृतीवर भर देण्यात यावा. कुपोषण दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. विशेषत: दुर्गम भागातील बालकांच्या पोषणाबाबत विशेष दक्षता घ्यावी. अर्भक व माता मृत्यू कमी करण्याचे प्रयत्न करावे. संस्थात्मक प्रसृतीवर भर द्यावा. प्रति हजार पुरुषामागे महिलांच्या घटत्या दराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

पात्र बचत गटांना डिसेंबर अखेरपर्यंत निधी वितरीत करण्यात यावा. बँकांकडे प्रलंबित प्रकरणांबाबत बँक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार घरकूलांचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे श्री.गावडे यांनी यावेळी सांगितले. घरकूलांच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या.

श्री.गमे यांनी घरकूल योजना, स्वच्छता अभियान, उमेद अभियान, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला बालकल्याण आदी विविध विषयांचा आढावा घेतला. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार