सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी चौपाळे प्राथमिक शाळेची निवड तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपशिक्षक कल्पेश गोसावी यांची निवड

नंदुरबार - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने

Nandurbar MH
  • Dec 21 2020 6:04PM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने सन २०२०-२१ या वर्षासाठी तंबाखू मुक्त राज्यस्तरीय बालपरिषद आॕनलाईन होणार आहे. या परिषदेसाठी जि.प.शाळा चौपाळे येथील इ. चौथी चे विद्यार्थी वैभव कैलास चित्रकथी, तेजस मनोज जाधव, जागृती शिवदास बंजारा , ओम संदिप माळी, यूक्ता अनिल बंजारा तसेच शिक्षक श्री कल्पेश गोसावी हे सहभागी होणार आहेत.
          या बालपरिषदे अंतर्गत तंबाखू मुक्त शाळा झाल्यानंतर आता तंबाखू मुक्त गाव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम करणार आहेत.या अंतर्गत बालपरिषदेच्या विद्यार्थ्यां सोबत श्री गोसावी सरांनी गावात अनेक दुकानांना भेटी देऊन दुकान मालकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न विकण्यासाठी प्रबोधन केले व तशी शपथ त्यांना घ्यायला लावली. हा उपक्रम राबवतांना कोरानाच्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. 
            बाल परिषदेच्या आॕनलाईन सभा ह्या Virtual Classroom च्या माध्यमातून घेण्यात येतात. या सभा होतांनाही मास्क व शारिरीक अंतर यांचे पालन केले जाते. या उपक्रमासाठी श्री.कल्पेश गोसावी सरांना  नंदुरबार तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी आदरणीय डाॕ. राहुलजी चौधरी साहेब, तसेच सन्माननीय विस्तार अधिकारी आदरणीय श्री सचिनजी गोसावी साहेब, तसेच सन्माननीय केंद्र प्रमुख आदरणीय वसंतजी पाटील सर, यांचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच चौपाळे शाळेचे सन्माननीय पदोन्नती मुख्याध्यापक आदरणीय श्री आतिरामजी पवार सर व संपूर्ण शिक्षक वृंद तसेच नवनिर्माण संस्था नंदुरबार यांचे अनमोल विशेष सहकार्य लाभत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार