सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी कोविड-१९ हॉस्पिटलांना रेमेडीसिवर इंजेक्शन उपलब्ध करन्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिले.

खासदार यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिले.

Nandurbar. MH
  • Apr 10 2021 10:04AM
 
    दिनांक ०९/०४/२०२१ रोजी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसद रत्न खासदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील उद्भवलेल्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमेडीसिवर इंजेक्शनची नितांत आवश्यकता आहे.
 
    परंतु सदर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत असून रुग्णांना वेळीच इंजेक्शन उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी डॉक्टर हिनाताई गावीत यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कोविड-१९ हॉस्पिटलच्या डॉक्टरांसोबत मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील हॉस्पिटल यांच्या मागणीनुसार त्यांना रेमेडीसिवर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करण्यात यावे यासाठी निवेदन दिले.
 
खासदार डॉक्टर हिनाताई गावीत त्यांनी दिलेल्या निवेदना ची दखल घेत मा. जिल्हाधिकारी सो यांनी प्रत्येक रुग्णालयाची माहिती घेऊन जिल्हाप्रशासन मार्फत इंजेक्शनच्या पुरवठा करण्याचा निर्णय घेतला व तात्काळ तहसीलदार, आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन केले.
 
   त्यामुळे एकीकडे रेमेडीसीवर इंजेक्शन वरून राजकारण होत असताना दुसरीकडे खासदार डॉक्टर हीनाताई गावीत यांनी केलेल्या मागणीला यश आले त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कोविड-१९ रुग्णालयांना जिल्हा प्रशासन मार्फत रेमिडीसिवर इंजेक्शन मिळणार आहे यामुळे सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी फायदा होणार आहे तसेच इंजेक्शन मुळे रुग्णांच्या नातेवाईक यांची धावपळ आता थांबणार असून त्यांना रुग्णालयातच रेमेडीशिवर इंजेक्शन उपलब्ध होईल. खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी केलेल्या मागणीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार