सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*झराळी फार्महाऊस आणि नगराध्यक्षांवरील कारवाई टाळावी म्हणूनच चंद्रकांत रघुवंशी करतात जिल्हाधिकाऱ्यांची वकिली - खा. डॉ. हिना गावित*

नंदुरबार- मी जिल्हाधिकारी यांना राजकीय स्पर्धक मानत नाही. त्यांच्या केवळ कार्यपद्धती विषयी तक्रार करीत आली आहे, असे स्पष्ट करतानाच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा लक्ष बनवले.

Sudarshan MH
  • Apr 27 2021 4:07PM

नंदुरबार- मी जिल्हाधिकारी यांना राजकीय स्पर्धक  मानत नाही. त्यांच्या केवळ कार्यपद्धती विषयी तक्रार करीत आली आहे, असे स्पष्ट करतानाच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा लक्ष बनवले. जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टाळावी तसेच झराळीच्या फार्महाउसवरील अतिक्रमणाची कारवाई टाळावी या स्वार्थापोटी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांचे प्रवक्ते बनून बोलत असतात, असा सणसणीत आरोप केला. 
       माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन खासदार डॉक्टर हिना गावित तसेच माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्यावर अनेक आरोप केले त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सायंकाळी लगेचच डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेतली त्याप्रसंगी त्या म्हणाले की, जिल्हाधिकारी त्यांच्यावर मी वैयक्तिक टीका करत नाही, त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते माझ्यासमोर उभे राहतील असा त्याचा अर्थ लावला जात आहे, परंतु मी टॉप टेन खासदार माणिकराव गावित तसेच सीनियर आमदार के. सी. पाडवी यांच्यासमोर लढली आहे आणि जिंकली देखील आहे. त्यामुळे भविष्यात माझ्यासमोर कोण उभा राहील याची मला परवा नाही. मी केलेल्या कामांवर माझा भरोसा आहे. त्यामुळे लोक ते विसरणार नाही. असे सांगून खा गावित म्हणाल्या की माझें शिक्षण हे मेरीटवर झाले आहे, त्या उलट आमदार रघुवंशी यांच्या मुलीसाठी त्यांनी डोनेशन दिले होते, झराळी फार्म हाऊस आणि नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत, ते लपवण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे जिल्हाधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याचा आरोप केला.
 त्या म्हणाल्या की, राजकारण येण्याआधी मी आरोग्य शिबिर घेतले तेव्हा अनेक अडचणी लक्षात आल्या, त्या सोडवण्यासाठी राजकीय क्षेत्रात आली आहे. मी स्वतः डॉक्टर असल्याने मला रुग्णांची व्यथा समजते परंतु वैद्यकीय क्षेत्राच्या अटी पूर्ण केल्याशिवाय मी प्रत्यक्ष रुग्ण हाताळू शकत नाही आणि म्हणूनच आजच्या बिकट स्थितीत मी ऋग्नसेवा स्वतः करू शकली नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार