सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 कोटींची मदत

नंदुरबार : गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीबाबत शासनातर्फे कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात

Nandurbar MH
  • Dec 10 2020 11:36AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार  : गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीबाबत शासनातर्फे कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत 25 कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले.  

 जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 12 हजार 150 शेतकऱ्यांना 16 कोटी 52 लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 4 कोटी 658 लाख (2754 शेतकरी), नवापूर  53 लाख 68 हजार (1135), शहादा 6 कोटी 99 लाख (3361), तळोदा 2 कोटी 83 लाख (2699), अक्कलकुवा 96 लाख 34 हजार (1100) आणि अक्राणी तालुक्यात 54 लाख 28 हजार (1101 शेतकरी) मदतीचे वाटप करण्यात आले.

जुन ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 16 हजार 124 शेतकऱ्यांना 8 कोटी 60 लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 32 लाख 5 हजार (472 शेतकरी), नवापूर 1 कोटी 56 लाख (4836), शहादा 90 लाख 48 हजार (1299), तळोदा 44 लाख 78 हजार (904), अक्कलकुवा 1 कोटी 28 लाख (2364) आणि अक्राणी तालुक्यात 4 कोटी 7 लाख  (6249 शेतकरी) मदतीचे वाटप करण्यात आले.

मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. प्रशासनाने प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुका स्तरावर नियेाजन केले होते. 2019 च्या मदतीपैकी 99.74 टक्के व 2020 च्या मदतीपैकी 90 टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे.  2020 च्या उर्वरीत रक्कमेचे वाटपाची कार्यवाही तालुकास्तरावर सुरु आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार