सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गायंत्री मंत्राला मद्यप्राशसनाशी जोडणारे विडंबन भोवले; गुजरातचा अभिनेता रंधेरियासह 5 जणांविरोधात नंदुरबारला तक्रार दाखल

नंदुरबार - गायत्री मंत्राचा मद्य प्राशनाशी संबंध दर्शवणारे चित्रण प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी

Nandurbar .MH
  • Dec 2 2020 11:35AM
सुदर्शन न्युज केतन रघुवंशी .नंदुरबार 
नंदुरबार - गायत्री मंत्राचा मद्य प्राशनाशी संबंध दर्शवणारे चित्रण प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हिंदु सेवा समितीचे नरेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून गज्जूभाईचे पात्र गाजवणारा गुजरातचा विनोदवीर सिद्धार्थ रंधेरिया सह 5 जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. 
    याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सिद्धार्थ रंधेरिया या गुजराती नायकाचा गज्जूभाईनी गोलमाल हा विनोदी कार्यक्रम प्रसारित होत असतो. त्याचे काही भाग युट्युब वरूनही प्रसारित होत असतात. त्यापैकी एका दृश्यात नायिका डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करतांना दाखवले आहे. त्याचवेळी नायक (सिद्धार्थ रंधेरिया) हा तीचे डोळे बंद असल्याची खात्री करीत बाटलीतील दारु तिच्या पुढील तांब्याच्या कलशात टाकतो. नायिकेच्या पाठो-पाठ नायक ढेकर- डकार दिल्या प्रमाणे मंत्रोच्चार करून विडंबन करतो. मंत्रा विषयी अनेक विनोद करतो. नंतर भू चा अर्थ पाणी व र्भुव: स्व: म्हणजे मोटोडो घोटोडो म्हणजे मोठे घोट घेणे, असे मंत्राचे चुकीचे अर्थ सांगतानाचेही दृश्यात दिसते. वस्तुत: गायत्री मंत्र हा वेद मंत्र असून प्रत्येक धार्मिक विधी मध्ये म्हटला जातो, असे नमूद करून फिर्यादीत म्हटले आहे की या कार्यक्रमातील नायक नायिका दिग्दर्शक पटकथालेखक आणि निर्माता यांनी नियोजन पुर्वक कट रचून संगनमताने पूर्ण देशभर हिंदू धर्माची बदनामी केली. विडंबनाच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना आणि श्रद्धा दुखवल्या. हिंदू धर्माबद्दल मनात द्वेष भावना बाळगुन एका राष्ट्रिय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसे प्रसारित केले. म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्वरीत अटक करुन त्यांना कडक शासन करावे,असे नरेंद्र परशराम पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार