नंदुरबार - शहरातील राजसारथी नगरात झालेल्या घरफोडीची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन उकल करण्यात आली असून दोघांकडून चोरी झालेल्या टीव्हीसह 10 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी राजसारथी नगरात राहणारे किशोर जयदेव पाटील यांचेकडे घरफोडी होऊन 32 इंची टीव्हीसह 9 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना सुचना केल्या होत्या.
त्यानुसार निरीक्षक विजयसिंग राजपुत, यांनी पोना राकेश मोरे, सुनिल पाडवी, दादाभाई मासुळ, पोकॉ अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सक्रीय केले व त्यासाठी गुप्त बातमीदार नेमले. सदर पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरुन दिनांक 14/4/2021 रोजी किरण दगा ठाकरे रा. पातोंडा आणि राज नारायण थनवार रा. मेहतर वस्ती यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता नमुद 'दोघांनी मिळुन राजसारथी नगरात घरफोडी केल्याचे मान्य करुन गुन्ह्यात चोरलेला 7 हजार रुपये किमंतीचा एक 32 इंची एलएडी टीव्ही तसेच 7 हजार 100 रुपये किमंतीचे चांदीचे दागिने काढुन दिले. दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.