सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हाधिकाऱ्यांकडून जामिया रुग्णा लयाचे कौतुक

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांना कोविड काळात चांगली सेवा देणाऱ्या जामिया रुग्णालयाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कौतुक केले आहे.

Nandurbar MH
  • Apr 24 2021 10:36AM


नंदुरबार  :  अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांना कोविड काळात चांगली सेवा देणाऱ्या जामिया रुग्णालयाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कौतुक केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी  या रुग्णालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड कक्षाला भेट दिली. जामिया इन्स्टिट्यूटतर्फे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयात 8 ऑक्सिज खाटा, 21 इतर खाटांसह सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या  आणि डिजीटल एक्स-रेची सुविधा आहे. दुर्गम भागातील जनतेसाठी रुग्णालयतर्फे अल्पदरात दिली जाणारी सेवा महत्वाची आहे. सेवाभावी वृत्तीने शुल्कात सवलतही दिली जात असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. रुग्णालयात कोविड खाटांची संख्या वाढवावी अशी सूचना त्यांनी केली.

इन्स्टिट्यूटमधील रुग्णालाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचारांना प्राधान्य देण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार खाटांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे जामिया इन्स्टिट्यूटचे मौलवी हुजेफा वस्तानवी यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,  प्र.तहसिलदार रामजी राठोड आदी उपस्थित होते.
-----

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार