सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबार: दूर्गमभागात वाहनासह 7 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त*

नंदुरबार - धडगाव-मोलगी रस्त्यावरील दूर्गमभागात सापळा लावून छापा टाकत वाहनासह 7 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.

Nandurbar. MH
  • Mar 23 2021 8:08AM
नंदुरबार - धडगाव-मोलगी रस्त्यावरील दूर्गमभागात सापळा लावून छापा टाकत वाहनासह 7 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. 
      अधिक व्रुत्त असे की, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना धडगाव-मोलगी रस्त्याने अवैध दारुची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यावर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना दिले. निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी पोलीस हवालदार विनोद जाधव, विकास अजगे, राकेश वसावे, काँस्टेबल राजेद्र काटके, अविनाश चव्हाण यांचे पथक तयार केले. नंतर धडगाव -मोलगी रस्त्यावरील भगदरी फाटा येथे वेषांतर करुन सापळा रचला. दिनांक 21 मार्च 2021 रोजी पहाटे 2 वाजता संशयीत महिंद्रा पिकअप गाडी आडवुन तपासणी केली. गाडीमध्ये 88 हजार रुपयांचे पॉवर-10000 सुपर स्ट्रॉन्ग बियरचे 500 एमएलचे 1176 टिन , 1 लाख 30 हजार रुपये किमतीच्या गोवा क्हिस्कीच्या 180 एमएलच्या 1000 बाटल्या दिसून आल्या. चालक व त्याचे साथीदारास गाडीतील मद्यसाठा वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांचेकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्याने सदर मद्यसाठा हा चोरट्या वाहतुकीने अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाल्याने रु.5 लाख किमंतीचे पिकअप वाहन व मद्यसाठा असा एकूण 7 लाख 18 हजार 200 रु. किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन चालक गुलाबसिंग कुत्र्या पटले रा खुंटामोडी ता. धडगाव, त्याचा साथीदार वनसिंग कागड्या मोरे, रा. खांडबारा ता. धडगाव तसेच मद्यसाठा वाहतुक करण्यास सांगणारा जहांग्या फौज्या रा. हट्टी ता. धडगाव यांचेविरुद्द मोलगी पोलीस ठाण्यात गुरनं 114/2021 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कम 65(ई) 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आला. 
       याशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मागील 3 दिवसांत जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या चालणा-या जुगारावर 6 छापे टाकून 8 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार