सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार :- बालिकेच्या मृत्युस कारणीभूत असलेल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारपासून नगरपालिके बाहेर हिंदू जनजागृती सेवा सहाय्य समिती तर्फे आमरण उपोषण _ आमरण उपोषण

हिंदू जनजागृती सेवा सहाय्य समिती तर्फे आमरण उपोषण _ आमरण उपोषण

Nandurbar MH
  • Dec 14 2020 7:17PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार, १३ डिसेंबर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षाच्या बालिकेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून नंदुरबार नगर पालिकेने बालिकेचे मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी तसेच मृत बालिकेचे वडील मुकेश माळी, सहा महिन्यांपूर्वी कुत्रे आडवे आल्याने अपघात होऊन मृत्युमुखी पडलेले बलराज राजपूत यांचे भाऊ मोहित राजपूत हे आज १४ डिसेंबर सोमवारपासून नंदुरबार नगर परिषदे समोर मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहेत.

पुढील मागण्यांसाठी उपोषण

१) मृत्युमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिचा मृत्यूला कारणीभूत असलेल्या नंदुरबार नगर परिषदेचा ठेकदाराचा ठेका रद्द करण्यात यावा

२) कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढण्याचे एक कारण-

बेकायदेशीर असलेले उघड्यावरील मांस विक्री दुकान आणि चिकन- मटणाचे पदार्थ बनवून विक्रीचा गाड्या यावर त्वरित कडक कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे

३) नंदुरबार नगर पालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी अथवा ठेकेदार यांचा हलगर्जीपणामुळे नागरिकास अपंगत्व आल्यास किंवा नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अपंगत्व आलेल्या व्यक्तीला तात्काळ २ लाख रुपये आणि मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये हानी भरपाई नगर पालिकेने द्यावी

४) मोकाट कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन देणे तसेच नसबंदी कार्यक्रम त्वरित राबविणे तसेच मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त त्वरित करावा

५) मोकाट गुरांमुळे ही अनेक लहान मोठे अपघात घडत असतात मोकाट गुरांचाही कायमस्वरूपी बंदोबस्त करावा

६) पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत पावलेली

हिताक्षी माळी हिचा कुटुंबियांना हानीभरपाई देण्यात यावी ती हानीभरपाई मुलीचा मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदाराकडून वसूल करून त्वरित मुलीचा कुटुंबियांना मिळवून द्यावी

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार