सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार : स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे संविधान दिन साजरा व मुंबई हल्ल्यातील शहिदांना शहर पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली

मुंबई हल्ल्यातील शहिदांना शहर पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली

Nandurbar MH
  • Nov 26 2020 5:57PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार :  येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला व 26 नोव्हेंबर 2008  साली झालेल्या मुंबई येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .याप्रसंगी नंदुरबार शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्री रवींद्र कळमकर यांच्या हस्ते  शहिदांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली.  याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.  याप्रसंगी  श्री निंबा माळी  यांनी  26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्याची माहिती  विद्यार्थ्यांसमोर  विशद केली.  व  भारतीय संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले सोनल महाले यांच्यासोबत सामूहिक संविधान वाचन  केले .याप्रसंगी  माननीय  रवींद्र कळमकर साहेब  व नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश माळी यांच्या सत्कार स्वागत, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय देवेंद्र भाऊ माळी यांच्या शुभहस्ते  करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक एन.जी .भावसार प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता चौरे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र माळी श्री निंबा माळी, वाय एस पाटील, विजय माळी, प्रवीण सोनवणे, प्रसाद माळी ,गणेश मराठे, सोनल महाले, दिपाली भामरे ,मनीषा गवळे,  दिपक माळी ,जगन्नाथ माळी ,सुनील वसईकर, धर्मेंद्र माळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निंबा माळी यांनी केले तर सर्व व उपस्थित मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक एन.जी .भावसार यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार