सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवाजी महाराजांच्या विचारांनी बळ मिळते - खा.डॉ.हिना गावीत

नंदुरबार-येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे अखंड भारताचे

Nandurbar- MH
  • Feb 19 2021 7:42PM
नंदुरबार-येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रम घेण्यात आला. 
कार्यक्रमास खासदार डॉ.हिनाताई गावीत, भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ.रविंद्र चौधरी, ज्येष्ठ पत्रकार सुर्यभान राजपूत, उपनगराध्यक्ष रविंद्र पवार, न.पा.प्रतोद नगरसेवक चारुदत्त कळवण, माजी उपनगराध्यक्ष शामबापू मराठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप, अशोक राजपूत, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, मराठा समाजाचे अध्यक्ष श्रावण मराठे, प्रल्हाद मराठे, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, महेंद्र मंगा चौधरी, मोहिनीराज राजपूत, हरीष हराळे, रोहिदास पवार, महेंद्र मराठे, भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजु रगडे, मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक राजेंद्र पाटील, नगरसेवक संतोष वसईकर, चेतन राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी खा.डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे तीन वेळा वाचन केले आहे. जेव्हा मी २६ व्या वर्षी खासदारकीची निवडणुक लढविली, त्यावेळी माझ्यासमोर ज्येष्ठ व अनुभवी उमेदवार उभे होते. त्यावेळी माझे विरोधक माझ्यावर हास्य करीत होते. परंतु मी शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होवून पूर्ण विश्‍वासाने निवडणूक लढली व ती जिंकलीही. मला शिवाजी महाराजांच्या विचारांनी निवडणुक लढण्याचे बळ मिळाले. यावेळी डॉ.रविंद्र चौधरी यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहीजेत. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात ठेवून आपल्या दैनंदिन जीवनात कार्य केले पाहीजे. क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण मराठे हे दरवर्षी शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहाने घेत असतात. त्यांचे हे कार्य उल्लेखनिय आहे. तसेच गजेंद्र शिंपी म्हणाले की, शिवाजी महाराजांनी आपल्या ५० वर्षी ११० किल्ले बांधले. काही जण या वयात स्वतःसाठी एक घरही बांधू शकत नाहीत. महाराजांनी या वयात देशातले पहिले मोठे आरमार उभे केले. सुरत येथे देशातील पहिला छापखाना महाराजांनी उभा केला. प्रास्ताविक व आभार क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविणदादा मराठे यांनी केले. तर सुत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पप्पू मराठे, उपेंद्र राजपूत, दीपक मराठे, भगतसिंग राजपूत, प्रेमचंद राजपूत, चिनु फटकाळ, अक्षय साळी, यशराज मराठे, खुमानसिंग राजपूत, हेमंत राजपूत, संदीप चौधरी, विनोद मराठे, युवराज राजपूत, भिमसिंग वळवी, मुकेश मराठे, छोटू कासार, आश्‍विन सोनार आदींनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार