सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: भाजपा आज वीज बिलांची करणार होळी

भाजपा आज वीज बिलांची करणार होळी

Nandurbar MH
  • Nov 23 2020 11:14AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - वाढीव वीज बिले रद्द करावी आणि कोरोना काळातील वीज बिल माफ करावे; या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वीज बिलांची होळी करुन आंदोलन छेडणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी आज  दिनांक 22 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, कोरोना महामारी मुळे लॉकडाउन  घोषित करण्यात आला होता. त्या संपूर्ण कालावधीत जवळपास सर्व सामान्य लोकांचा व्यवसाय आणि रोजगार मोडीत निघाला होता. अजूनही नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. असे असताना महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाने सर्रासपणे जादा वीज बिल आकारणी सातत्याने चालू ठेवली आहे. आधीच पिचलेल्या जनतेच्या खिशाला कात्री मारून आपले खिसे भरण्याचा प्रकार महा विकास आघाडीने चालवला आहे. या निंदनीय प्रकाराचा निषेध करतो. निषेध म्हणून वीज बिलांची होळी करण्यात येईल. अशी माहिती देऊन चौधरी यांनी पुढे सांगितले की या विषयावर लोक संतप्त आणि हवालदिल  देखील आहेत. संतप्त झालेल्या या जनतेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देणार आहोत. कोरोना लॉक डाऊन कालावधीतील वीज बिल माफ करावे आणि वाढीव वीज बिले रद्द करावीत ही आमची प्रमुख मागणी आहे, असे विजय चौधरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार