नवापूर प्रतिनिधी : गणेश वडनेरे
नंदुरबार- ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ विभागीय कराटे स्पर्धेचे आयोजन एस.ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कुल , नंदुरबार येथे करण्यात आले . विभागीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन मिशन हायस्कूलचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर यांच्या हस्ते करण्यात आले . सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ऑल नंदुरबार जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे , सच्चि गणेश मराठे , उपाध्यक्ष नरेंद्र माळी , प्रमोद बैसाणे , रंगावली साप्ताहिक संपादक गणेश वडनरे ब्लॅकबेल्ट प्रशिक्षक कल्पित नाईक , नवापुर तालुका कृषी अधिकारी बापू गावीत , नंदुरबार जिल्हा किक बॉक्सिंगचे सचिव योगेशमाळी आदी मान्यवर उपस्थित होते . नाशिक विभागातून जवळपास ११५ ते १२० खेळाडू मुलामुलींचा समावेश होता स्पर्धा ( काता आणि कुमिती ) अश्या दोन प्रकारामध्ये खेळण्यात आल्या कराटे स्पर्धा वय वर्ष ६ ते १७ या गटातील होत्या विभागीय कराटे स्पर्धेला राष्ट्रीय पंच म्हणुन योगिता बैसाणे स्वयं शिद्धा मास्टर ट्रेनर ज्योती चौधरी व जिल्ह्यातील पंच पवन बि - हाडे अमित पाडवी , गणेश गोसावी , विशाल सोनवणे , नरेंद्र बिहाडे , याकुब मोहमद , ओंकार जाधव , निशिल राठोड , लीना पंडित , ओम गोसावी यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली . सदर स्पर्धेचे ऑफिशियल रेफ्री म्हणून निलेश पाडवी व पुष्कराज वळवी यांनी काम पाहिले सूत्र संचालन सृष्टी गावित हिने केले तर आभार जिल्हा सचिव गणेश मराठे यांनी मानले .
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333