सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरात पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त; एकास अटक*

शहरात पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त; एकास अटक*

Sudarshan MH
  • Feb 3 2023 12:03PM


नंदुरबार- नंदुरबार शहरात बेकायदेशीर लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगताना आढळला म्हणून शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. शहादा तळोदा पाठोपाठ नंदुरबार शहरात सुद्धा अवैध शस्त्र बाळगणारे आढळत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. 


  जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कायदेशीर करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे सुचना दिल्या होत्या. अशातच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना नंदुरबार शहरातील बस स्थानकाजवळ एका इसमाजवळ बंदुक दिसून आली आहे, अशी माहिती मिळाली. सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना कळवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी संशयीत इसमाचा शोध घेवून ताब्यात घेणेबाबत अंमलदारांना सांगितले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शोध घेतला आणि एका संशयताला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 15 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व व 600/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे अधिक विचारपूस केली असता तो, प्लॉट क्रमांक 111, राणी लक्ष्मीबाई चाळ कांदीवली ईस्ट, मुंबई येथील राहाणार असून मागील 04 महिन्यांपासून उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर जिल्ह्याच्या रामपुर गावात राहात असलेबाबत सविस्तर माहिती दिली.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नंदुरबार शहरामध्ये येण्याचे कारण काय ? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक श्री. एस. बी. आहेर, पोलीस हवालदार संदिप गोसावी पोलीस नाईक भटु धनगर, पोलीस अमंलदार विशाल मराठे, अनिल बढे यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार