सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रुग्णवाहिका उलटली; सुदैवाने 11 गरोदर मातां बचावल्या

नंदुरबार - गरोदर मातांची तपासणी करून परत जाणारी

Sudarshan MH
  • Feb 1 2023 9:35PM


नंदुरबार - गरोदर मातांची तपासणी करून परत जाणारी रुग्णवाहिका अचानक उलटल्यामुळे गरोदर मातांसह चालक जखमी झाला सुदैवाने यात प्राणहानी टळली असली तरी गरोदर मातांना मात्र गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या आणि पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील शहादा उप रुग्णालयात धाव घेतली. 

प्राप्त माहितीनुसार धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तेलखेडी आरोग्य केंद्रातून 11 गरोदर मातांना तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. हे रुग्णवाहिका शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे महाविद्यालयासमोरून जात असताना अचानक उलटली. प्रचंड आवाज आणि महिलांच्या किंकाळ्या ऐकून रस्त्यावरील लोक धावून आले.  उलटलेल्या वाहनातून त्यांनी महिलांना सुखरूप बाहेर काढले. तातडीने त्यांना शहादा जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात ग्रस्त सर्व महिला गरोदर असल्याने त्यांना झालेली दुखापत गंभीर मानली जात आहे. तीन महिलांना फ्रॅक्चर असून दोन-तीन महिलांच्या डोक्याला मार बसला आहे असे प्रत्यक्ष दर्शीकडून सांगण्यात आले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार