सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेल्वे प्रवासातच आला हार्ट अटॅक; वेळीच रेल्वे पोलीस धावल्याने वाचला जीव

वेळीच रेल्वे पोलीस धावल्याने वाचला जीव

Sudarshan MH
  • Feb 1 2023 9:28PM


नंदुरबार - धावत्या रेल्वेत हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाला नंदुरबार पोलिसांनी जीवदान दिल्याची घटना येथील रेल्वे स्थानकावर घडली.

वारंगळ (तेलंगणा) येथील श्रीनिवास नरसय्या कस्तुरी (४८) हे त्या प्रवाशाचे नाव आहे. ते नवजीवन एक्सप्रेसने सुरत शहराकडे प्रवास करीत होते यादरम्यानच दोंडाईचा स्थानक सुटल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. ही माहिती त्यांची पत्नी तेजस्वी कस्तुरी व मुलगी लक्ष्मी कस्तुरी यांनी गाडीतील टीटीईला दिली. त्यांनी नंदुरबार रेल्वेस्थानकात त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे कळवल्यानंतर दुपारी १२:२५ वाजेदरम्यान रेल्वेगाडी नंदुरबार स्थानकात आल्यानंतर श्रीनिवास कस्तुरी यांना तातडीने खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  रेल्वे पोलीस निरीक्षक त्र्यंबक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रकाश गोसावी, रवी पाटील तसेच पोलिस नाईक विशाल कतीलकर हे तिघेही नंदरबार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर पोहोचले होते. याठिकाणी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात माहिती देण्यात आली. जिल्हा रुग्णालयात औषधोपचार मिळाल्याने श्रीनिवास कस्तुरी यांचा जीव वाचला.  कस्तुरी यांचा जीव वाचला. यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी पोलिस निरीक्षक कळमकर व पोलिसांचे आभार मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार