सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दंडपाणेश्वर गणेश मूर्तीवरील चांदी चोरली, दानपेट्याही फोडल्या, शंखेश्वर जैन मंदिरातही चोरी

दानपेट्याही फोडल्या, शंखेश्वर जैन मंदिरातही चोरी

Nandurbar. MH
  • Jan 9 2023 4:34PM


नंदुरबार - शहरातील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री दंडपाणेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीवरील दोन किलो चांदीचे आभूषण तसेच चार दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरांनी लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते माझी उपनगराध्यक्ष पोखराज जैन यांच्या सक्री रोडवरील फार्म हाऊस आवारातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून पंचवीस हजार रुपये चोरांनी लंपास केले शहर पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दाखल होताच विविध भागात पोलीस पथक रवाना करून चोरांचा शोध घेणे सुरू झाला आहे.

आतापर्यंत दुचाकी चोरीचे सत्र चालवले गेले त्या पाठोपाठ चोरांनी मंदिरांना लक्ष केले असल्याचे यावरून लक्षात येते याच्यापूर्वीही लहान मोठ्या मंदिरातील दानपेट्या गायब करण्याचे प्रकार घडले आहेत त्यातील काही प्रकरणी फिर्यादी दाखल होत नाहीत तसाही आज सोमवार रोजी पहाटे उघडकीस आलेला प्रकार धक्कादायक आहे उद्या मंगळवार रोजी या वर्षाची पहिली मंगळी चतुर्थी आहे त्याच्या आदल्याच दिवशी अत्यंत जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या दंडपानेश्वर गणपती मंदिरातील चांदीची आभूषण चोरण्यात आली एका प्रतिष्ठित गणेश भक्त व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वीच चांदीत घडवलेले गणपतीचे कर्ण सोंड आणि गळ्यातील हार दंडपाणेश्वर मंदिर ट्रस्टला दान म्हणून दिले होते आज पहाटे ते सर्व चोरीला गेले तसेच दंड पानेश्वर मंदिर परिसरातील चार दानपेट्यांची कुलपत तोडून रक्कम चोरण्यात आली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दंड पानेश्वर मंदिर ट्रस्ट कडून पाच ते सहा हजार रुपये गेले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या मंदिर ट्रस्टने अलीकडेच पेटीतून रोज रक्कम काढून हिशोब करण्याचा पायंडा पाडला असल्यामुळे चोरांच्या हाती अधिक रक्कम लागली नाही हे विशेष या मंदिर परिसरात आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत परंतु चोरांनी मंदिर परिसरात प्रवेश करताच आधी डीव्हीआर फोडला नंतर दानपेटी तोडून नाल्यात फेकल्या असे मंदिर ट्रस्ट कडून सांगण्यात आले दरम्यान याच कालावधीत हाच पहाटे साखरे रस्त्यावरील देवेंद्र जैन यांच्या फार्म हाऊस मधील महावीर मंदिरा देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे येथे सुद्धा चोरांनी आधी तेथील निवासस्थानी मागील बाजूने जाळीचा दरवाजा वाकवून घरात प्रवेश मिळवला तेथील तीन कपाटा चे कुलूप तोडून सामान फेकण्यात आला नंतर त्या बंगल्यासमोर असलेल्या मंदिरात जाऊन दानपेटी तोडली त्यातील 25 हजार रुपये रक्कम लंपास केली सकाळी फार्म हाऊस वरील कर्मचाऱ्यांना नाल्यात फेकलेल्या पेट्या आढळून आल्या याप्रकरणी देखील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाले आहे दरम्यान शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील आणि पोलीस उपाधीक्षक सचिन हिरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागात पोलीस पथक रवाना केले तसेच संशयीतांची झाडाझडती सुरू केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार