सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

Sudarshan MH
  • Jan 4 2023 5:40PM


*नंदुरबार:* अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात 13 डिसेंबर,2022 रोजी 1 दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सदर स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष (9307143016), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार (02564-210047)  तसेच चाईल्ड लाईन (1098) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (9421477143 ) वर संपर्क साधुन सदर अर्भकांस दहा दिवसाच्या आत ताब्यात घ्यावे. अन्यथा सदर अर्भकांस शिशुगृहात दाखल करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री.पाडवी यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार