सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम, दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत 141 गुन्हे दाखल..!!!

दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत 141 गुन्हे दाखल..!!!

Sudarshan MH
  • Jan 2 2023 3:37PM

नंदुरबार - नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहादरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा मद्यपी वाहन चालकांविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांनी धडक मोहीम राबवून दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत 141 गुन्हे दाखल केले. 


इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दिनांक 30 व 31 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी संपूर्ण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने संपुर्ण नंदुरबार जिल्हयात दिनांक 30/12/022 ते दिनांक 31/12/2022 या या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान 141 वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे- 05, उपनगर पोलीस ठाणे-23, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे- 08, नवापूर पोलीस ठाणे- 14, विसरवाडी पोलीस ठाणे-10, धडगांव पोलीस ठाणे-05, म्हसावद पोलीस ठाणे- 05, सारंगखेडा पोलीस ठाणे-06, अक्कलकुवा पोलीस ठाणे- 11, तळोदा पोलीस ठाणे-08, मोलगी पोलीस ठाणे- 03 व शहर वाहतूक शाखा 24 गुन्हे असे एकुण 141 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून माहे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या एक

वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या 391 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 358 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार